अवैधरित्या शासकीय जागेचा वापरकर्त्या ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करा; बीडीओकडे तक्रार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील पाडळसे येथील ग्रामपंचायत सदस्य तुषार रामचंद भोई व पुनम मनोज पाटील यांनी ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय जमिनीवर अवैधरित्या अतिक्रमण केले असल्याने त्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियमा अंतर्गत सदस्यपदावरून अपात्र करण्यात यावे अशी मागणी पाडळसे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा अॅड. सुरज मनोहर पाटील यांनी गटविकास अधिकारी यावल यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे.

या संदर्भात यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांना लेखी स्वरूपात दिलेल्या निवेदनाव्दारे तक्रार केली असुन, या निवेदनात म्हटले आहे की पाडळसे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य पुनम मनोज पाटील यांनी गट नंबर १२३४ मध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून जागेचा वापर करत आहे तसेच ग्रामपंचायत सदस्य तुषार रामचंद्र भोई यांनी मौजे पाडळसे गावठाण परिसरातील मालमत्ता क्रमांक १९६४ या सरकारी गावठाण जमिनीवर अतिक्रमण करून रहिवास करत आहे सबब त्यांना यावल गटविकास अधिकारी यांनी पाडळसे ग्रामपंचायत सदस्य पुनम मनोज पाटील व तुषार रामचंद भोई यांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याने त्यांना सदस्य पदावरून अपात्र करण्यात यावे या आशयाची मागणी केली आहे.

Protected Content