Home Cities भुसावळ भुसावळ नगरपालिकेतील सत्ताधार्‍यांवर कारवाई करा- उल्हास पगारे

भुसावळ नगरपालिकेतील सत्ताधार्‍यांवर कारवाई करा- उल्हास पगारे

0
32

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ नगरपालिकेतील सत्ताधार्‍यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले असून यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आज जनआधारी आघाडीने केली आहे.

जनआधार आघाडीचे गटनेते उल्हास पगारे यांच्यासह या आघाडीच्या नगरसेवकांनी आज जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे भुसावळ नगरपालिकेतील सत्ताधार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, २१ फेब्रुवारी रोजी आमच्या चार सदस्यांवरील अपात्रतेची कारवाई रद्द करण्यात आली. मात्र असे असूनही आम्हाला २८ रोजी होणार्‍या नगरपालिकेच्या सभेचा अजेंडा देण्यात आलेला नाही. परिणामी नगरपालिकेतील सत्ताधार्‍यांनी न्यायालयाचा अवमान केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर जनआधार आघाडीचे गटनेते उल्हास पगारे यांची स्वाक्षरी आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound