धरणगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या तडजोडीकरीता ‘लोक न्यायालयाचे आयोजन आज करण्यात आले होते.
येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशानुसार कनिष्ठ स्तर न्यायालयात मा.एस.डी.सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुका विधी सेवा समिती आणि वकिल संघ यांचे संयुक्त विद्यमाने येथील न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या तडजोडी करीता लोक न्यायालयाचे आयोजन आज करण्यात आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, “दिवाणी व फौजदारी न्यायमूर्ती धरणगाव एस.डी. सावरकर यांच्या लोक न्यायालयात दाखलपूर्व खटले यात स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र त्याचप्रमाणे रत्नाकर को.ऑफ बँक यांचेकडील ६४७ प्रकारणांपैकी २८ प्रकरणे समोपचाराने मिटविण्यात आले. त्यात रक्कम रुपये १२,८८,२२७, त्याचप्रमाणे न्यायालयातील २२३ प्रकरणे ठेवण्यात आली त्यापैकी ३३ प्रकरणांचा आपसात समझोता करण्यात आला. यामध्ये रक्कम रुपये २२,१८,२९८ असे एकूण ८७० प्रकरणांपैकी ६१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. याशिवाय एकूण रक्कम ३५,०६,५२५ इतक्या रुपयांची वसूली यावेळी लोक न्यायालयात सामोपचाराने करण्यात आली.
या लोक न्यायालयात पॅनल पंच म्हणून ऍड.संदीप जे.पाटील, ऍड.गिरीष सी.कट्यारे यांनी कामकाज पाहिले. या लोक न्यायालयाच्या प्रक्रियेत न्यायमूर्ती एस.डी. सावरकर, सहाय्यक अधीक्षक जे.ओ.माळी यांनी कामकाज पाहिले.
या लोक न्यायालयात धरणगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड.बी.के.आवारे, उपाध्यक्ष अॅड.संदीप सुतारे, सचिव अॅड.शरद माळी, सहसचिव महेंद्र चौधरी, अॅड.मनोज जी. दवे, अॅड.विक्रम परिहार, अॅड.संजय शुक्ला, अॅड.राहुल एस पारेख, अॅड.वसंतराव भोलाणे, अॅड.सी.झेड.कट्यारे, अॅड.अजय बडगुजर, अॅड.एम. इस्राईल, अॅड.प्रदीप पाटील, अॅड.प्रशांत क्षत्रिय, अॅड.आसिफ कादरी, अॅड.आर.एस.शिंदे, अॅड.कैलास एन. मराठे, अॅड.गणेश मांडगे, अॅड.डी.ए. माळी, अॅड.संजय महाजन, अॅड.राजेंद्र येवले, अॅड.गजानन पाटील आदी. उपस्थित होते.
याप्रसंगी गणेश चौधरी, राहुल पाटील, ईश्वर चौधरी, संतोष चौधरी, एस.के.सपकाळे, पी.एम.विसपुते, ए.आर.बाविस्कर, वाय.डी.पाटील यासह शिपाई यांनी लोकन्यायालयाचे कामकाज पूर्ण केले. यावेळी लोक न्यायालयात पक्षकारांनी मोठया संख्येत उपस्थिती दिली होती.