मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याने ते बरखास्त करण्यात यावे अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली असून ते या संदर्भात राज्यपालांकडे मागणी करणार आहेत.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे. हे सरकार शेतकर्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. आम्ही लवकरच राज्यपालांकडे ही भूमिका मांडणार आहोत. शेतकर्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी या ईडीच्या भाजपच्या सरकारने घेतली पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही राज्यपालांकडे जाणार आहोत.
नाना पटोले म्हणाले की, राज्यातील शेतकर्यांची दिवाळी अंधारात गेलेली आहे. राज्य सरकारने मदत जाहीर केली असली तरी यातील एक पैसा देखील शेतकर्यांना मिळालेला नाही. आधीच अतिवृष्टीने शेतकरी जेरीस आला असतांना राज्य शासनाच्या अनास्थेमुळे त्यांची दिवाळी ही अतिशय निराशेत गेली आहे. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर कॉंग्रेसतर्फे तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.