मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बेलसवाडी येथे एका वासरासोबत नवयुवकाने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली असून यामुळे परिसरातुन याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बेलसवाडी येथील शेतकऱ्याच्या खळ्यात एका तरूणाने गोवंशाच्या वासरासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संदर्भात त्या व्यक्तीने मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. या अनुषंगाने पोलिसांनी गुरनं ७७/२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम-२९९ तसेच ११ (सी) प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम आणि ११९ महाराष्ट्र पोलीस कायदा यांच्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणातील संशयित हा अल्पवयीन असण्याची शक्यता असून पोलीस या संदर्भात खातरजमा करत आहेत. तर या घटनेची सर्वत्र निंदा करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र चाटे हे करत आहेत.