जळगाव (प्रतिनिधी)मंडळी लहान मुलं खूप जास्त प्रमाणात फास्टफूड खात असतात. त्यामुळे त्यांच्या शरीराला ते हानिकारक ठरू शकते. त्यामुळेच एक आई आपल्या मुलांना जास्तीत जास्त प्रकारात निरोगी कसे ठेवू शकते ? याचाच सतत विचार करीत, शेफ हर्षाली चौधरी यांनी ‘बीट-टोमॅटो फ्रुट पंच’ तयार केले. मुलांसाठी आकर्षक आणि चविष्ट असा गोड-आंबट लागणारा हा ज्यूस आहे. बीट आणि टोमॅटो हे जास्तीत जास्त प्रमाणात मुलांच्या शरीरात गेल्यामुळे त्यांच्या
रक्तवाढीस त्यामुळे मदत होते. यामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण जास्त असते.
मात्र, काही मुलांना ही दोन्ही फळे आवडत नाहीत. बीटरूट सामान्य रोगांना मुक्त करण्यास मदत करते. लाल-लाल बीटरूट आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असते. तसेच टोमॅटोमध्ये एन्टी अॉक्सिडंट गुण असतात, जे आपल्या शरीरात कॅन्सर पसरवणाऱ्या सेल्सची वाढ होऊन देत नाही. टोमॅटोत असेही गुण असतात, जे आजार पसरवणाऱ्या विषाणूंशी लढतात आणि आपल्या शरीरात इम्यूनल सिस्टीम म्हणजेच आपली रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करतात. शरीरातील हीमोग्लोबिन वाढवतात, रक्त शुद्ध करतात. तसेच डोळ्यांसाठीही टमाटे लाभदायक असतात.
लागणारे साहित्य । टोमॅटो ज्यूस, बीट ज्यूस, हनी-जीरे पावडर, काळे मीठ, बर्फाचे तुकडे व सजावटीसाठी पुदिना.
अशाचप्रकारे अन्य पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी ‘लाइव्ह ट्रेंडस् न्यूज’ला नियमित भेट देत रहा.