जळगाव प्रतिनिधी । देशातील वैद्यकीय महाविद्यालयांना येणार्या विविध अडचणी आणि वाढीव जागांसंदर्भात दिल्ली येथे निती आयोगाचे अध्यक्ष डॉ.व्ही.के.पॉल यांच्या समवेत बैठक होवून महत्वांच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. निती आयोगांच्या अध्यक्षांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषयांबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
केंद्रिय निती आयोगाचे अध्यक्ष डॉ.व्ही.के.पॉल यांच्यासमवेत देशातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या व विद्यापीठाच्या अध्यक्षांसह प्रतिनिधींची महत्वाची भूमिका २८ रोजी पार पडली. या बैठकीला गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, शारदा विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.गुप्ता, साळवे मेडिकल कॉलेजचे डॉ.आशिष देशमुख, इपीएसआयचे सचिव पालनीवेल हे उपस्थीत होते. या बैठकीत डॉ.पॉल यांनी वैद्यकीय महाविद्यालयांना येणार्या विविध अडचणी आणि वाढीव जागांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच या संदर्भात त्यांनी काही मुद्दे नोंदवून घेत नॅशनल मेडिकल कॉन्सिलला सुचना देण्याबाबत बैठकीत आश्वासन दिले. या बैठकीत डॉ.व्ही.के.पॉल यांच्याशी विविध मुद्दयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच या वेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ.व्ही.के.पॉल यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.