चाळीसगाव येथे अ.भा.ग्राहक पंचायत बैठकीत अनेक तक्रारींवर चर्चा

d0b0b5c0 3b7c 46cc 8c8b 3b8dfbdd4706

चाळीसगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची एक महत्वपूर्ण बैठक आज येथील श्रीसमर्थ क्लासेस येथे जिल्हाध्यक्ष विकास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत अनेक तक्रारींवर चर्चा करण्यात आली.

 

यावेळी विज वितरणासंबंधी तक्रारीची दखल घेण्यात आली. ग्राहकांची फसवणुक टाळण्यासाठी अधिकारी व ग्राहक पंचायतीचे पदाधीकारी यांची एकत्र बैठक घेण्यात यावी. तसेच मुद्रा लोनबाबतही चर्चा करण्यात आली. रेशन दुकानदार अनेक ग्राहकांना यादीत नाव असुनही धान्य देत नाही. कापड दुकानदार खराब व फाँल्टी कपडे, साडया बदलून देत नाही . अनेक बियाणे व खतांचे दुकानदार किमतीपेक्षा जास्त पैसे घेतात. अशा अनेक तक्रारींवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष रमेश सोनवणे यांनी आत्तापर्यंतं केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. यावेळी जिल्हा अध्यक्ष यांनी ग्राहक पंचायीतीचे कार्य व महत्व सविस्तर सांगुन मार्गदर्शन केले. तसेच चाळीसगाव टिमचे कार्य अतिशय उत्तम असल्यामुळे त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी तालुका कार्यकारीणीची निवडही करण्यात आली. तसेच महिला अध्यक्षा सुशीला महाजन, उपाध्यक्षा ज्योती महाजन, चंद्रकला चव्हाण, सचिव ज्योती सोनवणे, यांची यावेळी निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य डाँ. अर्चना पाटील, रमेश सोनवणे, जिल्हा प्रतिनिधी म्हणून डाँ. विशाल पाटील, संगिता देशमुख, किशोर रणधीर, वाल्मिक महाजन, रमेश पोतदार यांनी यावेळी ग्राहक पंचायतीवर आधारित सुंदर कविता सादर केली. बैठकीला सुरेश चौधरी,अलका महाजन, दिनेश महाजन, रविंद्र पिंगळे, शिवराम महाजन, नाना महाजन, वर्षा चौधरी, भैरवी महाजन, तेजस्वीनी महाजन, पार्थ महाजन, राजेंद्र माळी, पंडित देवरे, अनुराधा खैरनार, निता पाटील, रमेश पोतदार, भगवान वाणी, रविंद्र पाटिल, अलका भवर, पाटे मँडम, अनितां पाटील, ललिता महाजन यांच्यासह अनेक कार्यकते व ग्राहक उपस्थित होते. शेवटी आभार शहर अध्यक्ष वाल्मिक महाजन यांनी मानले.

Add Comment

Protected Content