नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधानांसोबत निर्भयपणे बोलू शकेल, तत्त्वांच्या आधारे त्यांच्याशी चर्चा करेल तसेच कोणतीही चिंता न करता आपले विचार व्यक्त करू शकेल,अशा नेत्याची देशाला आवश्यकता आहे,असे विधान भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी केले आहे.
माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत बोलत असताना मुरली मनोहर जोशी यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. यावेळी बोलतांना जोशी म्हणाले की, निर्भिडपणे आपले विचार व्यक्त करेल अशा नेत्याची देशाला गरज आहे. त्याने मांडलेले विचार ऐकून पंतप्रधान खूश होतील की नाराज? याची चिंता त्याला नसावी,असे देखील जोशी म्हणाले.