जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मूळजी जेठा महाविद्यालयाच्या एन.सी.सी आणि एन.एस.एस. युनिट आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आर टी ओ कार्यालय आणि जळगाव वाहतूक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 ऑगस्ट २०२२ रोजी महाविद्यालयात रस्ता सुरक्षा जागृती अभियानासंदर्भात कार्यक्रम सफल झाला.
या वेळी प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ए.ए. शेख, डेप्युटी आर.टी.ओ. श्याम लोही आणि वाहतूक शाखेचे निरीक्षक लीलाधर कानडे यांची व्याख्याने झालीत. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसोर एस.एन. भारंबे हे अध्यक्ष स्थानी होते.
श्याम लोही यांनी रस्ता अपघाताची करणे आणि उपाय स्पष्ट केलीत तर न्यायाधीश श्री शेख यांनी कायद्याच्या वाहतूक, रस्ता सुरक्षे बाबत सखोल बाबी छात्र सैनिकांना सांगितल्यात. तसेच त्यानी स्वयंसेवक आणि छात्र सैनिक यांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अपघात जनजागृती संदर्भात विविध फाळके आणि रस्ता सुरक्षेसंदर्भात फलके लावण्यात आलेली आहेत. लेफ्ट. (डॉ.) योगेश बोरसे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्था सांभाळून सुत्रसंचलन देखील केले. एन.एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलवरसिंग वसावे यांचे सहयोग लाभले तर सी.टी. ओ. गोविंद पवार यांनी आभार मानलेत.