Home प्रशासन नगरपालिका फैजपूर पालिकेचे आरोग्य निरीक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करा; राष्ट्रवादी गटनेते शेख कुर्बान यांची...

फैजपूर पालिकेचे आरोग्य निरीक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करा; राष्ट्रवादी गटनेते शेख कुर्बान यांची मागणी

0
104


फैजपूर ता. यावल । फैजपूर पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नगरसेवकांशी अरेरावी करणाऱ्या आरोग्य निरीक्षक लक्ष्मण चावरे यांच्यावर शिष्टभंगाची कारवाई करावी अशी मागणी पालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते शेख कुर्बान शेख करीम यांनी मुख्याधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

बुधवारी मुख्याधिकारी यांच्या दालनात दुपारी 4 वाजता 5 ते 6 नगरसेवक शहरातील केरकचरा व गटारी तुंबल्यामुळे तक्रार करण्यासाठी आले असता आरोग्य निरीक्षक लक्ष्मण चावरे यांनी नगरसेवकांशी अरेरावी केली.त्यामुळे नगरसेवकांचा अपमान झाल्याच्या भावनेतून नगरसेवक  शेख कुर्बान यांनी चावरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना नोटीस देण्यात यावी अशी मागणी केली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांना सुद्धा पाठवण्यात आली आहे.

 


Protected Content

Play sound