जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात ठोस भूमिका न घेणाऱ्या बाल कल्याण समितला बरखास्त करा अशी मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एरंडोल तालुक्यातील खडके येथील बालगृहातील मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पिडीत मुलींनी बाल कल्याण समितीकडे तक्रार केली होती. मात्र समितीने कोणतीही दखल घेतली नाही. या करीत समिती अध्यक्ष व सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल कल्याण समितीचे कार्य हे काळजी घेण्याचे व संरक्षणाची गरज असलेल्या मुला-मुलींबाबत तात्काळ क्रियाशिल राहणे गरजेचे असते. बाल कल्याण समितीकडे दांडाधिकाऱ्यांचे न्यायपीठ म्हणून कार्य केले असते मात्र एवढे मोठे अधिकार असतांना खडके येथील मुलींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाले आहे. बाल कल्याण समितीने केलेला निष्काळजीपणा लक्षात घेता ही समिती तातडीने बरखास्त करावी व नविन समिती त्वरीत गठीत करावी. नवीन समितीचे सामाजिक भावना असणारे सर्वधर्मीय सदस्य नेमावे अशी मागणी निवेदनाद्वारे करीत आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष जमिल देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, सचिव महेंद्र सपकाळे, उपमहानगराध्यक्ष आशिष सपकाळे, ललित शर्मा, सतिष सैदाणे, चेतन पवार, विभागीय अध्यक्ष साजन पाटील आदी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.