भुसावळ प्रतिनिधी । शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानक परिसरात प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य दिसत आहे. तसेच ठिक-ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलीय. यामुळे प्रवासांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थितीत होत असून बस परिवहन मंडळाने बस स्थानक स्वच्छ राहिल, याकडे लक्ष द्यावे. असा प्रश्न प्रवासांकडून उपस्थितीत होत आहे.
याचबरोबर बसस्थानक आवारात मोकाट जनावरे बिनधास्त फिरत असल्याचे दिसून येत आहे. या मोकाट जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बस स्थानकातील प्रवाशांना बसण्यासाठी ठेवलेले बॅचेस् देखील तुटलेले आहे. पावसामुळे बस स्थानक परिसरांमध्ये मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये टाकलेल्या मुरुम मिश्रित मातीमुळे चिखल निर्माण झाला आहे. प्रवाशांना त्यामधूनच बस पर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग काढावा लागत आहे. यामुळे वयोवृद्ध प्रवासी व लहान बालकांचे अतोनात हाल होत असल्याच चित्र पाहावयास मिळत आहे. परिसरामध्ये नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले. यामुळे दुर्गंधी मोठ्याप्रमाणात पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन बस स्थानक परिसरात स्वच्छता करावी, अशी अपेक्षा प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.