Home Cities जळगाव प्रभाग १३ मध्ये महायुतीचे जोरदार शक्तीप्रदर्शन 

प्रभाग १३ मध्ये महायुतीचे जोरदार शक्तीप्रदर्शन 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीकडून प्रचाराचा जोर वाढवण्यात आला असून आज मोहन नगर परिसरात महायुतीच्या उमेदवारांनी भव्य प्रचार रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले. या रॅलीमुळे परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

महायुतीचे उमेदवार नितीन सपके, सुरेखा नितीन तायडे तसेच प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली ही प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात डॉ. सुतार यांच्या घरापासून झाली. त्यानंतर हिरकणी डेअरी, मोहन नगर, साखरवाडी आदी भागांतून रॅली मार्गक्रमण करत गेली. या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे फुलांच्या वर्षावात व घोषणाबाजीने उत्स्फूर्त स्वागत केले.

रॅलीदरम्यान उमेदवारांनी घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. प्रभागाच्या विकासासाठी महायुतीकडून राबविण्यात येणाऱ्या योजना, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी ठोस आराखडा असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. नागरिकांनीही आपल्या अपेक्षा आणि समस्या उमेदवारांसमोर मांडत सकारात्मक प्रतिसाद दिला.

मोहन नगर व परिसरातील तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभाग घेतला. महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. प्रचार रॅलीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.


Protected Content

Play sound