केंद्रात महत्वाच्या खात्यांमध्ये संयुक्त सचिव म्हणून खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची थेट नियुक्ती

Central Secretariat

 

मुंबई (वृत्तसंस्था) सर्वसाधारणपणे केंद्रातील महत्वाच्या खात्यांमध्ये सचिव होण्यासाठी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे असते. मात्र जलद आणि पारदर्शक कारभार व्हावा, या हेतूने 9 जणांची मोदी सरकारने थेट निवड केली आहे.

 

खासगी क्षेत्रातल्या 9 तज्ज्ञांची थेट केंद्रातल्या महत्वाच्या खात्यांमध्ये संयुक्त सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. यामध्ये अमर दुबे (नागरी उड्डयन ), अरुण गोयल (वाणिज्य), राजीव सक्सेना (आर्थिक मुद्दे ), सुजीत कुमार बाजपेयी (पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन), सौरभ मिश्रा (वित्तीय सेवा) आणि दिनेश दयानंद जगदाळे (अपारंपरिक ऊर्जा ), सुमन प्रसाद सिंह (रस्ते, परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय), भूषण कुमार (जहाजरानी) आणि कोकोली घोष (कृषी आणि शेतकरी कल्याण) यांची संबंधित खात्यांमध्ये संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Add Comment

Protected Content