Home राजकीय दिग्विजय सिंह दहशतवादी; प्रज्ञासिंहचे पुन्हा वादग्रस्त विधान

दिग्विजय सिंह दहशतवादी; प्रज्ञासिंहचे पुन्हा वादग्रस्त विधान


 

Digvijay singh pradnya thakur

भोपाळ (वृत्तसंस्था) भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना दहशतवादी म्हणत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. सीहोर येथे निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना साध्वीने दिग्विजय सिंह यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान, साध्वीच्या सततच्या वादग्रस्त विधानामुळे भाजपची डोकेदुखीही वाढली आहे.

 

मुंबईवरील हल्ल्याचे शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दलच वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूरने यावेळी म्हटले की, १६ वर्षांपूर्वी उमा भारती यांनी त्यांना पराभूत केले होते. त्यामुळे १६ वर्ष ते डोकं वर काढू शकले नव्हते. त्यांना राजकारण ही करता आले नाही. आता पुन्हा त्यांनी डोकं वर काढले तर त्यांना पुन्हा एका संन्याशीनीशी सामना करावा लागत आहे. साध्वीविरोधात भोपाळमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह उभे आहेत. साध्वीने नुकतंच शहिदांचा अवमान करणारे वक्तव्य केले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound