चाळीसगावचे दिग्वीजय पाटील युपीएससीत उत्तीर्ण

 चाळीसगाव प्रतिनिधी । येथील दिग्वीजय संजय पाटील यांनी युपीएससी परिक्षेत १३४ वी रँक मिळवली असून ते जिल्हाधिकारी बनणार आहेत.

शहरातील घाटे कॉम्प्लेक्स येथील डॉ. संजय पाटील यांचे सुपुत्र दिग्वीजय संजय पाटील यांनी गेल्या वर्षी युपीएससी परिक्षेत ४८२ वी रँक मिळवून इंडियन रेव्हेन्यू सर्व्हीसमध्ये स्थान प्राप्त केले होते. मात्र यंदा अधिक जोमाने अभ्यास करून त्यांनी आज जाहीर झालेल्या युपीएससी परिक्षेच्या निकालात १३४ वा क्रमांक पटकावला आहे. यामुळे त्यांची आयएएस वर्गवारीत निवड झाली असून ते जिल्हाधिकारी बनणार आहेत. दिग्वीजय पाटील यांच्या या यशामुळे त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे.

Add Comment

<p>Protected Content</p>