Home क्रीडा कबड्डी स्पर्धेला मान्यवरांची भेट

कबड्डी स्पर्धेला मान्यवरांची भेट


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या खेळप्रेमींसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक अभिमानाचा क्षण ठरलेला, कारण CBSE क्लस्टर 9 कबड्डी स्पर्धा 2025 मध्ये केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री  श्रीमती रक्षाताई खडसे आणि खासदार स्मिताताई वाघ यांनी उपस्थित राहून स्पर्धेचे उद्घाटन आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

विवेकानंद प्रतिष्ठानच्या काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, जळगाव येथे सुरू असलेल्या या भव्य कबड्डी स्पर्धेत सहभागी होताना दोन्ही मान्यवरांनी आपल्या सदिच्छा भेटीमधून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. जिल्ह्यात अशा प्रकारची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित होणे ही जळगावच्या शैक्षणिक आणि क्रीडा परंपरेची एक सकारात्मक पावती असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मा. रक्षाताई खडसे यांनी शाळेच्या खेळ क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करताना असे सांगितले की, “CBSE स्तरावर अशा स्पर्धा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधीचे दार उघडतात. या माध्यमातून त्यांना राष्ट्रीय पातळीवर आपली क्षमता सिद्ध करता येते.” त्याचबरोबर त्यांनी आयोजकांचे विशेष अभिनंदन केले. मा. स्मिताताई वाघ यांनीही विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर घालणाऱ्या अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमात केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत दादा अमळकर, क्षुधा शांतीचे अध्यक्ष श्री संजयजी बिर्ला, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, शाळेच्या उपाध्यक्षा सौ. हेमाताई अमळकर, सचिव विनोद पाटील, सहसचिव दिलीप महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत आणि संयोजन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडले.

CBSE क्लस्टर 9 कबड्डी स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा येत्या २८ जुलै रोजी होणार असून, या स्पर्धेने जळगावच्या विद्यार्थ्यांना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.


Protected Content

Play sound