सावदा ता.रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अलीकडेच कालवस झालेले स्वामीनारायण देवस्थानाचे प्रमुख कोठारी शास्त्री भक्ती किशोर दासजी यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यात कार्यक्रमानिमित्त खिरोदा येथे आलेल्या काँग्रेस नेत्यांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली.
या सभा प्रसंगी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी गृह मंत्री अनिल देशमुख, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी गृह राज्य मंत्री सतेज पाटील तसेच रावेर यावल चे आमदार शिरीष चौधरी यानी कार्यक्रमाला उपस्थित राहुन आदरांजली व्यक्त केली.