फैजपुर (प्रतिनिधी)। यावल व रावेर तालुक्यातील सर्व गावातील, शहरातील नागरिकांना अचूक असे डिजिटल सातबारा काम 15 दिवसात पूर्ण करण्याची सूचना प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिले. फैजपुर प्रांताधिकारी कार्यालयात यावल रावेर तालुक्यातील मंडळाधिकारी,तलाठी यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी प्रशिक्षण कार्यशाळेत उपस्थित मंडळाधिकारी, तलाठी यांना मोठ्या प्रोजेक्टर वर डिजिटल सातबारा कसे कामकाज करावे व कमी वेळेत सातबारा मधील दुरुस्ती असेल तर कामकाज कसे व्हावे, याबाबत महत्वपूर्ण सूचना यावेळी देण्यात आले. पंधरा दिवसात डिजिटल सातबाराचे काम पूर्ण झाल्यावर आपले सरकार, तलाठी कार्यालय, तहसील कार्यालयात खातेदार आपले डिजिटल सातबारा काढू शकतील त्यासाठी तलाठी यांनी कामकाजात गती आणावी, अशी सूचना यावेळी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली आहे.
या प्रशिक्षण कार्यशाळेत मंडळाधिकारी सचिन जगताप,शरद पाटील हे प्रशिक्षण देत आहे. या डिजिटल सातबारा कार्यशाळेला यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर, रावेर तहसीलदार अभिलाषा देवगुणे यावेळी उपस्थित होते. या कार्यशाळा यशस्वीतेसाठी फैजपुर मंडळाधिकारी जे.डी. बंगाळे, तलाठी पी.पी.जावळे यांनी परिश्रम घेतले.