अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बिलखेडे येथील रहिवासी डिगंबर ज्ञानेश्वर पाटील (वय ३८) यांचे आज (दि.१५ मे) सकाळी ९.३० वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचा स्वभाव मितभाषी होता. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्यावर आजच सायंकाळी ५.०० वाजता बिलखेडे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, दोन मुले असा परिवार आहे.