जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डिझेल चोरी करणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी देऊळगाव राजा जि. बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे डिझेल चोरीच्या प्रकरणातील संशयित जळगाव एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, अशोक महाजन, अश्रफ शेख, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, मुरलीधर बारी यांचे पथक तयार करुन रवाना केले. यापथकाने एमआयडीसी परिसरातून संशयित तानाजी मेंजा शिंदे (वय-३१, रा. खामकरवाडी ता. वाशी जि. उस्मानाबाद) व त्याचा साथीदार राहुल मधुकर काळे (वय-२०, रा. सरमकोंडी ता. वाशी जि. उस्मानाबाद) या दोघांना अटक केली. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी बुलढाणा येथील देऊळगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.