धुळे प्रतिनिधी । गेल्या चोवीस तासांमध्ये धुळे जिल्ह्यात ४९० नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून याच कालावधीत तिघांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
धुळे जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप कायम असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच नव्याने ४९० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत झालेल्या रुग्णांची संख्या ५१८ तर बाधित रुग्णांची संख्या ३४ हजार ५४८ वर पोहचली आहे. सर्वाधिक मृत्यू ग्रामीण भागात ३०८ झाले असून महापालिका क्षेत्रात २१९ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये धुळे शहरातील चितोड येथील ५० वर्षीय महिला, नकाणे रोडवरील द्वारका नगरातील ५७ वर्षीय पुरुष आणि साक्री तालुक्यातील बोधगाव येथील ५४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.