जळगाव प्रतिनिधी । सामाजिक कार्यकर्ते धुडकू सपकाळे यांच्यासह एकावर आज दुपारी प्राणघातक हल्ला झाल्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयडीसी हद्दीतील काशिनाथ हॉटेलजवळ एका कारमधून चार जण आले व त्यांनी थेट हमाल-मापाडी संघटनेचे नेते तसेच नगरसेविका मीना सपकाळे यांचे पती धुडकू सपकाळे आणि गजानन देशमुख या दोघांवर तलवार व बेस बॉलच्या बॅटच्या सहाय्याने सामाजिक कार्यकर्ते हल्ला चढविला. हल्ला केल्यानंतर चौघे घटनास्थळावरून पसार झाले होते. भर दिवसा झालेला हल्ला हा बाजार समितीतल्या हमाल-मापाडी संघटनेच्या वर्चस्वाच्या स्पर्धेतून घडल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याआधारे पोलिसांनी संशयित म्हणून नितीन सोनवणेसह इतर तिघांना ताब्यात घेतले आहे. अद्यापपर्यंत या घटनेबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल झालेला नाही.