धरणगाव (प्रतिनिधी) येथील नूतन विकास सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेनेचे शहर संघटक धीरेंद्र पुरभे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा परीट समाजातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला.
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झालेल्या या सत्कार प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, शिरीष बयस, नूतन सोसायटी संचालक निलेश चौधरी, राजेंद्र महाजन, भगवान महाजन, शैलेंद्र चंदेल व सर्व सचालक उपस्थित होते.