Home प्रशासन तहसील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे भडगाव तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे भडगाव तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  भडगाव तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांन कडून विविध मागण्या संदर्भात आज भडगाव तहसिल कार्यालय समोर आज धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी भडगाव तालुक्यातील सर्व रेशनदुकानदार बांधव उपस्थित होते.

यावेळी जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील भाजपचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोल शिंदे, भाजपचे भडगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, शिवसेनेच्या (उ.बा.ठा) गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या सह विविध पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला यावेळी भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे व पुरवठा निरीक्षक ज्ञानेश्वर अमुतकर यांना निवेदन दिले.

यावेळी संघटनेचे भडगाव अध्यक्ष जयवंत पाटील, उपाध्यक्ष आंनदा सोनवणे, सचिव लक्ष्मण पाटील यांच्या सह तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते


Protected Content

Play sound