धरणगाव-लाईह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार बांधव यांच्या तर्फे विविध मागण्या संदर्भात तहसिल कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेशनदुकानदारांना कमिशन वाढ, संपूर्ण वजन असलेले चांगल्या प्रतीचे धान्य, ekyc साठी प्रत्येक व्यक्ती ५० रुपये मिळावे , प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मार्जिन मिळणे, ऑनलाईन डेटा त्वरित करणे तसेच लाभार्थी वाढविणे, शासकीय गोदामातून धान्य ज्यूट बारदान मधून मिळणे, NPH साठी धान्य सुरू करणे, अंत्योदय योजनेतील ७ पेक्षा जास्त लाभार्थी असलेले कार्ड प्राधान्य योजनेत वर्ग करावेत. अश्या विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले
याप्रसंगी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आर डी पाटील, संघटनेचे जी.डी.पाटील, प्रभाकर पाटील, बंटीशेठ ओस्तवाल, मार्गदर्शक मिलिंद पवार, रविंद्र महाजन, बाबुलाल पाटील, नंदलाल पाटील, कैलास पाटील, संजय भालेराव, छोटू पाटील, जालम वंजारी, विकासो भोद, निशाणे बचत गट आदी असंख्य दुकानदार बांधव उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन तसेच प्रास्ताविक राजूशेठ ओस्तवाल यांनी केले तर आभार अमृत पाटील यांनी मानले.