चाळीसगाव प्रतिनिधी । शहरासह तालुक्यातील १९ स्मशानभूमीतून श्री सदस्यांनी २३ टन सुका कचरा संकलित केला. या उपक्रमात ७०७ श्री सदस्य सहभागी झाले होते.
सकाळी साडेसात ते अकरा वाजेच्या दरम्यान अभियान राबवले गेले. शहरातील दयानंद हॉटेल खरजई रोडवरील स्मशानभूमीपासून अभियानाला सुरूवात झाली . त्याच वेळेमध्ये चामुंडा माता मंदिरा जवळील राजपूत व देशमुख समाजाच्या स्मशानभूमीत शेकडो टन कचरा संकलित करण्यात आला. यावेळी नगसेवक रविंद्र गिरधर चौधरी उपक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी तात्काळ पालिकेचे जेसीबी व ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले. यावेळी अन्य नगरसेवकांचे देखील सहकार्य लाभले.