जळगाव प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील चिंचोली येथील मुळ रहिवासी तर सबलेजच्या मागे केमिस्ट भवनाजवळील रहिवासी अशोक धर्मा कोळी (वय ५६) यांचे आज पहाटे ५.१० वा. मिनीटांनी अल्पशा आजाराने निधन झाले. ते महाराणा प्रताप हायस्कूलचे सेवानिवृत्त शिपाई कर्मचारी होते.
त्यांच्या पश्चात भाऊ पत्नी, दोन मुले, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते प्रकाश कोळी यांचे भाऊ तर लाईव्ह ट्रेन्ड न्यूजचे गिरीष कोळी व मोहनीराज कोळी यांचे वडील होत. त्यांची अंत्ययात्रा केमिस्ट भवन जवळून राहत्या घरून आज संध्याकाळी ४ वा. निघून नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.