धरणगाव प्रतिनिधी । हैद्राबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यात आला आणि कोपर्डी येथे जेरबंद असलेल्या आरोपींना ही त्वरीत फाशी देण्यात यावी, अशी मागणी राजे प्रतिष्ठान धरणगावतर्फे तहसीलदार यांना आज करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, दि. २७ नोव्हेंबर रोजी हैद्राबाद येथे डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर अमानुष अत्याचार झाला. हे कृत्य अगदी घृणास्पद आहे. त्याचसोबत कोपर्डी येथील जेरबंद आरोपी व डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर अत्याचार करणारे आरोपी यांना न्यायालयाने त्वरीत फाशी द्यावी, अशी मागणी आज राजे प्रतिष्ठान मार्फत करण्यात आली.
निवेदनावेळी ता.अध्यक्ष वैभव पाटील, श.अध्यक्ष राजेंद्र महाजन, ता.कार्याध्यक्ष ललित मराठे, ता.उपाध्यक्ष योगेश पाटील, ता.प्रसिद्धी प्रमुख ललित पाटील, ता.सचिव दिनेश भदाणे, ता.संघटक त्र्यंबक पाटील, जगदीश जगताप, युवासेना श.शहर संघटक लक्षमण माळी, योगेश येवले, विक्रम पाटील, विशाल ठाकूर, ॲड.संदिप पाटील, हर्षल चौहान, शुभम पाटील, मेघराज पाटील, समाधान पाटील, प्रशांत पाटील, अतुल माळी, भूषण पाटील, गणेश पाटील, विनोद पाटील आणि नीलेश पाटील यांच्यासह आदी यावेळी उपस्थितीत होते.