धरणगावात डॉक्टराअभावी तरुणाचा मृत्यू ; नागरिकांचे रास्तारोको आंदोलन (व्हीडीओ)

d5aae09f 6897 4cd3 9869 91dbb231324b

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील गारखेडा येथील एका तरुणाचा आज सकाळी शहरातील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टराअभावी तरुणाचा मृत्यू झाला आहे. यावेळी संतप्त नागरिकांनी साधारण तासभर रास्तारोको आंदोलन केले.

 

या संदर्भात अधिक असे की, आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास गारखेडा येथील विलास कैलास पाटील (वय २०) हा युवकाला सुकवलेले कपडे काढत असताना शॉक लागला. विलास याला त्याच्या भावाने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतू याठिकाणी डॉक्टर नसल्याने त्याच्यावर वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त गावकऱ्यांनी एक तास रुग्णालय बाहेर रास्ता रोको आंदोलन केले. याठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात येत आहे.

 

Protected Content