धरणगाव Dharangaon प्रतिनिधी । कोविडचा वाढता संसर्ग पाहता प्रशासनाने धरणगाव शहरात २३ मार्चपासून पाच दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.
धरणगाव शहरातह तालुक्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. यात अलीकडच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात पॉझिटीव्ह रूग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शहरात कडक निर्बंध लागू करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती.
या अनुषंगाने प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आज Dharangaon शहरात २३ ते २७ मार्च या पाच दिवसांच्या कालावधीत कडकडीत बंद पाळण्यात येईल असे जाहीर केले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांनी नोटिफिकेशन जारी केले आहे. या जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता संपूर्ण बाजारपेठ, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहणार आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या बंदचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.