Home Cities जळगाव केशरी कार्ड धारकांसाठी स्वतंत्र कोटा करण्याची मागणी

केशरी कार्ड धारकांसाठी स्वतंत्र कोटा करण्याची मागणी

0
25

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील केशरी कार्ड धारकांना रेशन दुकानदार धान्य देत नसून यांच्यासाठी स्वतंत्र कोटा वाढवून धान्य वाटप करण्यात यावे, अशी मागणी पी. एम. पाटील यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री व सचिव यांना जळगाव बाळासाहेब ठाकरे शिवसेनातर्फे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

जिल्ह्यामध्ये अनेक केसरी रेशन कार्ड धारक असून त्यांना रेशन दुकानदार धान्य देत नाहीत, असे हजारो कार्डधारक जिल्ह्यात आहेत. या संदर्भात महाविकास आघाडी सरकार असताना अन्न नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांना सुद्धा निवेदन देण्यात आले होते. परंतु रेशन धारकांना धान्य पुरवठा पूर्ण मिळत नसल्यामुळे ते केशरी रेशनधारकांना धान्य देऊ शकत नाही. यासाठी स्वतंत्र कोटा वाढवून मिळाल्यास तरच यांना धान्य देता येईल. असे जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितले. या संदर्भात अन्न नागरी पुरवठा मंत्री व सचिव यांना जळगाव बाळासाहेब ठाकरे शिवसेनातर्फे लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचे पी. एम. पाटील यांनी सांगितले.


Protected Content

Play sound