निशाणे फाट्याजवळ अपघातात एक ठार; पाच जखमी

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील निशाणे फाट्याजवळ दोन मोटारसायकलींना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

याबाबत वृत्त असे की, निशाणे फाट्याजवळ आज दोन दुचाकींना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना धडक दिल्यानंतर पळ काढला आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी जखमींना ग्रामीण रूग्णालयात जखमींना दाखल केले आहे. दरम्यान, यातील एका रूग्णाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

Protected Content