Home प्रशासन तहसील धरणगाव नगरपरिषदेची अवघ्या ४ महिन्यांत ‘इतक्या’ कोटींची वसुली!

धरणगाव नगरपरिषदेची अवघ्या ४ महिन्यांत ‘इतक्या’ कोटींची वसुली!


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव नगरपरिषदेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील केवळ चार महिन्यांत विक्रमी ४.४४ कोटी रुपये कर वसुली करून नव्या इतिहासाची नोंद केली आहे. नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. रामनिवास झंवर यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली, कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी, कर निरीक्षक श्री. हितेश जोगी, व विद्युत अभियंता राहुल तळेले यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली.

वसुलीसाठी दोन विशेष पथके स्थापन करण्यात आली होती. या पथकांनी थकबाकीदारांविरोधात कडक पावले उचलली. तब्बल ४५ नळ कनेक्शन्स बंद करण्यात आले तर १० थकबाकीदारांचे गाळे सील करण्यात आले. याशिवाय अनेक थकबाकीदार मालमत्ता धारकांवर जप्तीची कारवाई देखील करण्यात आली. नगरपरिषदेने यावर्षी ‘करमुक्त बचतगट अभियान’ राबवून शहरातील १२० बचतगटांना करमुक्त केले. या बचतगटांचा गौरव मा. पालकमंत्री व पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी NULM विभागातील सहायक प्रकल्प अधिकारी तुषार सोनार व त्यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली.

विक्रमी वसुली मोहिमेत अनिल पाटील, भगवान माळी, जितेंद्र वाघमारे, सिकंदर पारधी, केशव पैठणकर, गणेश चौधरी, मयूर पाटील, राजेश संगपाळ, शुभम जोशी, नारायण माळी, सुरेश सोनवणे, राजेंद्र माळी, गणेश पाटील, शिरीष पाटील, संभाजी पवार, दीपक वाघमारे, आबिद मेहतर, गुलाम गौस दस्तगीर, मोहन महाजन, राजेंद्र शिंदे, सुरेश चौधरी, प्रशांत चौधरी, वसंत चव्हाण, युवराज चौधरी, विशाल बन्सी यांच्यासह इतर कर्मचारी वर्गाने अपार मेहनत घेतली.

मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी सर्व व्यापारी, नागरिक आणि पत्रकार बांधवांचे विशेष आभार मानले असून, येणाऱ्या काळात देखील नगरपरिषदेच्या कर रकमा वेळेत भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. थकबाकीदार मालमत्ता धारकांवर जप्तीची कार्यवाही सुरू असून, नागरिकांनी आपली थकबाकी लवकरात लवकर भरून अशा कठोर कारवाईपासून बचाव करावा, असे आवाहनही त्यांनी केले.


Protected Content

Play sound