धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर नसल्याचा बोर्ड लावल्याने रूग्णाचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
धरणगाव ग्रामीण रूग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून वैद्यकिय अधिकारी नसल्याने रूग्णांचे हाल होत आहे. बुधवारी सायंकाळी चक्क रूग्णालयात डॉक्टर नसल्याचा बोर्ड लावण्यात आला होता. वेळोवेळी ग्रामीण रूग्णालयात निवासी वैद्यकिय अधिकारी यांची नियुक्त करावी अशी मागणी केली आहे. लोकप्रतिनिधी यांनी देखील याकडे लक्ष देवून जळगाव जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात जावून पाठपुरावा करावा अशी मागणी तालुक्यातील नागरीकांची होत आहे.