धानोरा प्रतिनिधी । लोक सहभागातुन सुरु करण्यात आलेल्या डॉ. बी. आर. आंबेडकर मोफत अभ्यासिकातर्फे परिसरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाचा कार्यक्रम (दि. 24 जुन) रोजी सकाळी 11 वाजता जि.प. प्राथमिक शाळामध्ये होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जि.प. प्राथमिक मराठी व ऊर्दू शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच सातपुडा पर्वतातील बढाई, बडवाणी प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना २१०० वह्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. यासाठी महेंद्र पाटील व डॉ. चंद्रभान पाटील (पुणे) ११०० वह्या, योगेश पाटील व श्री सुर्यकांत खांडेभराड (नाशिक) ७०० वह्या व सद्गुरु स्टील धानोरा ५१ वह्या दिल्या आहेत. तरी ज्यांन देण्याची इच्छा असेल अश्यांनी संपर्क साधावा. या कार्यक्रमासाठी पदाधिकारी दिलीप पाटील (आरोग्य सभापती जळगाव जि.प.), डॉ. मंजुषा क्षिरसागर (प्रा. डायट जळगाव), बी. जे. पाटील (प्राथ.माध्य.शिक्षणाधिकारी), डॉ. राजेंद्र महाजन (अधिव्याख्याता डायट), सय्यद अलताप अली (विषय सहाय्यक डायट), किशोर वायकोळे (उपशिक्षणाधिकारी जळगाव जि.प.), कल्पना पाटील (पं.स.सदस्य चोपडा), भावना भोसले (गटशिक्षणाधिकारी चोपडा), मनोज पवार (प्रा.सपोनि अडावद पो स्टे), किर्ती पाटील (सरपंच), माणिकचंद महाजन (मा.उपसभापती पं.स.) अंबादास पाटील (केंद्रप्रमुख, धानोरा), शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, शिक्षणप्रेमी, सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित राहणार आहेत.