धानोरा प्रतिनिधी । यावल व चोपडा तालुक्यातील आठ ते दहा गावांना तब्बल ५० तासांपासुन शेतशिवारात विज गायब असल्याने केळी व कापसाचे अंकुर जळत आहेत.तर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे शंभरावर संतप्त ग्रामस्यांनी आज सकाळी दहा वाजता धानोरा येथील विजवितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. येथे अभीयंताच उपस्थीत नव्हते. मात्र पोलीस बंदोबस्त मागवल्याने शेतकऱ्यांच्या संतापात अधिकच भर पडली. होती.यावेळी अडावदचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज पवार यांनी शेतकऱ्यांची समजुत काढत शांत केले.
दि.२ रोजी परिसरात आलेल्या वादळाने पारगाव, देवगाव, पंचक, लोणी, मितावली आदी गावांमध्ये मोठ्याप्रमाणावर विजेचे खांब कोसळले आहेत. तेथे विजपुरवढा तात्काळ सुरू करणे कठीण आहे. या गावांनाही पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत.मात्र बिडगाव, वरगव्हान, शेवरे कुंड्यापाणी या गावांना कुठलेही खांब किंवा विद्युत तार तुटले नाहीत. किरकोळ बिघाड आहे तरिही निव्वळ धानोरा विजवितरण कार्यालयाचा भोंगळ कारभारामुळे गेल्या ५० ते ६० तासांपासुन येथे थ्रीफेज विजपुरवठा खंडीत आहे. त्यामुळे परिसरात कमी पाणी असतांनाही जेमतेम लावलेल्या बागायती केळी व कापसाला फुटलेले अंकुर जळु लागले आहेत.त्यामुळे बिडगाव व वरगव्हान येथील संतप्त शंभर शेतकऱ्यांनी मंगळवारी १० वा.धानोरा विजवितरण कार्यालयावर धडक दिली.येथे शेतकरींच्या भावना ऐकुन समस्या सोडवण्यासाठी अभियंताच हजर नव्हते मात्र शेतकऱ्यावर दबाव आनण्यासाठी अडावद पोलीस स्टेशनहुन पोलीसगाडी सह बंदोबस्त लावल्याने शेतकऱ्यांचा संताप अधिकच वाढला होता. यावर शेतकरी व्यक्त करीत होते.यावेळी एपीआय मनोज पाटील यांनी मात्र समयसुचकता पाळत शेतीऱ्यांच्या भावना विजअधिकारींपर्यन्त पोहचवत समस्या सोडवण्याची विनंती केली.व शेतकऱ्यांचीही समजुत घालत कायदा हातात न घेण्याचे आव्हान करत त्यांना शांत केल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी शंभरावर शेतकरी व अनेक पदाधिकारी उपस्थीत होते.