धानोरा (प्रतिनिधी ) धानोरा येथे सोमवारी झालेल्या रावेर लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार डॉ उल्हास पाटील याच्या प्रचार अर्थ झालेल्या सभेत भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडुन टिका करण्यात आली.
यावेळी व्यक्त्यांनी मोदींच्या ५६ इंच छाती या मुद्द्याची खिल्ली उडवताना ५६ इंचाचीच छाती वाला चोर निघाला असे म्हटले. केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नुसत्याच बढाया मारतात, प्रत्यक्षात ते ज्या गोष्टींचा खुबीने वापर करीत आहेत त्या सर्व काँग्रेसची देणं आहे. आज आपण फेसबूक, ट्विटर वापरतो त्यासाठी लागणारा काॅम्प्युटर आणि मोबाईल ही काँग्रेसची देण आहे. देश चालवायला ५६ इंच छाती नव्हे तर एक ह्रदय लागतं, चांगलं मन लागतं. मी पण विचार करीत होतो की ५६ इंच छाती म्हणजे केवढी मोठी छाती असते. ५६ इंचाच तर गोदरेजचं कपाट येतं, अशा शब्दांत काँग्रेसच्या कार्यकर्तेनी मोदीवर कडकडुन टिका केली. मोदी मूळ प्रश्नांना बगल देत वेगळ्या प्रश्नांची चर्चा करत आहेत. ते प्रत्येक वाक्यात संभ्रम निर्माण करतात कारण त्यांनी बोलण्यासारखं काहीही काम केलेलं नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्याचा फायदा होत नाही म्हणून व्यक्तिगत पातळीवर टीका करू लागले आहेत, अशी टीका त्यांनी केली. भाजपाने पंचतारांकीत कार्यालय उभारलं, पण डॉ. आंबेडकर स्मारकाची वीटही रचली नाही असा आरोप केला. वक्ते पुढे म्हणाले की, 14 एप्रिल बाबासाहेबांचा जन्मदिन म्हणजे तमाम आंबेडकरी जनतेसाठी तो सन्मानदिनच आसतो. मात्र आमच्या सन्मानाची या सरकारला अजिबात फिकीर नाही. कारण अडीच वर्षांपूर्वी आंबेडकर स्मारकाचे भुमिपूजन करूनही अद्याप कामाला सुरूवातही झालेली नाही. त्यावेळी बिहार विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने आंबेडकरी मते मिळवण्यासाठी घाईघाईत कोणतीही परवानगी नसताना पंतप्रधानांच्या हस्ते या स्मारकाचे भुमिपूजन उरकले गेले. आता मात्र वेळकाढूपणा केला जात आहे. यातूनच या सरकारची दलितविरोधी मानसिकता स्पष्ट दिसत असून आंबेडकरी जनता या निवडणुकीत या सरकारला त्यांची खरी जागा दाखवेल असा दावा काँग्रेसच्या कार्यकर्तेनी लोक सभेत सांगितले.