सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर-यावल मतदारसंघात खानापूर, नेरूळ, पाडले बुद्रुक, पाडले खुर्द येथे धनंजय चौधरी यांनी आज १0 ऑगस्ट शनिवार रोजी कृतज्ञता दौरा केला. पाणी वाचवण्याची धरूया कास,सर्वांचा होईल नक्कीच विकास या उक्तीप्रमाणे युवा नेते माननीय धनंजय भाऊ चौधरी यांनी कृतज्ञता दौऱ्याचे औचित्य साधून दौऱ्याची सुरुवात खानापूर येथे गावातील ग्रामस्थ यांच्या हस्ते जलपूजन व वृक्षारोपण करून केले सदरील दौऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असून सुद्धा ग्रामस्थांची उपस्थिती ही लक्षणीय बाब होती माननीय आमदार श्री शिरिष दादा चौधरी यांनी केलेल्या खानापूर,नेरूळ, पाडले बु., पाडले खुर्द. येथे विकासाच्या खुणा ठिकठिकाणी दिसत होत्या.गावामध्ये आमदार शिरिष चौधरी यांनी पेवर ब्लॉक,गटारी, रस्ते, संरक्षण भिंती तसेच जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी व पाईपलाईन इत्यादी कामे प्रत्येक गावात केलेले असून ग्रामस्थांनी त्याबद्दल युवानेते धनंजय भाऊ जवळ आ.शिरिष दादा बद्दल आभार व्यक्त केले.सदर दौऱ्यात विविध प्रसार माध्यमांनी युवा नेते धनंजय चौधरी यांच्याशी संवाद साधला असता सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थिती बद्दल बोलताना तरुणांच्या बेकारीकडे लक्ष वेधले त्याचप्रमाणे पक्ष कोणताही असो विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी असावा व त्याचा बारकाईने अभ्यास करावा,समस्यांना सामोरे जावे लागते,समस्या एक ठिकाणी बसून सुटत नाही असे विचार माननीय धनंजय भाऊ यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रकट केले.
खानापूर येथे धनंजय भाऊ चौधरी यांनी गावातील प्रसिद्ध दुर्गादेवी मंदिर,श्रीराम मंदिर,ओम चैतन्य कानिफनाथ देवस्थान,खानापूरश्री, दत्त मंदिर येथे धनंजय चौधरी यांनी जाऊन दर्शन घेतले. नेरूळ येथील श्री दत्त मंदिर येथे धनंजय चौधरी यांनी दर्शन घेतले. कुमार नरवाडे यांच्या हस्ते खानापूर येथील करण्यात आले त्याप्रसंगी गावातील मंडळी दत्तात्रय महाजन, डॉक्टर सुरेश पाटील, संजय बोंडे, गिरीश धांडे, पोलीस पाटील कांचन धांडे, धनु महाराज, संजय धांडे, बाळू भारंबे,गुड्डू शेठ,शामराव महाजन,धनु धांडे,यांची उपस्थिती लाभली.
निरूळ सरपंच आशाताई पाटील,मनीषा गोपाल पाटील, लताबाई रमेश पाटील,ऊपसरपंच समाधान फकीरचंद खैरे यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले तसेच गावातील जेष्ठ वरिष्ठ नागरिक प्रकाश खैरे संदीप सैमिरे, बाळू पाटील,विलास पाटील,रमेश पाटील,उदयभान पाटील,सोपान पाटील,वसंत पाटील यांची उपस्थिती लाभली. पाडला बु.येथील जलपूजन मा.धनंजय भाऊ चौधरी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच हमीद तडवी ईश्वर महाजन,अमजद तडवी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी गावातील मंडळी गुलशेर तडवी, रुबाब तडवी, बाळू तायडे हे उपस्थित होते. पाडले खुर्द सरपंच महेंद्र पाटील,उपसरपंच फकीरा तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, पोलीस पाटील किशोर पाटील, बिस्मिल्ला तडवी भोगाव सर्व गाव मंडळ व सर्व गाव मंडळी उपस्थित होते.
खानापूर येथील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा येथे वृक्षारोपण कुमार नरवाडे,गिरीश भंगाळे,डॉक्टर सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी गावातील इतर मंडळी गिरीश धांडे,बाळू भारंबे,कैलास धांडे, शामराव महाजन,पोलीस पाटील कांचन धांडे,दत्तात्रय धांडे,शिवाजी हायस्कूल शाळेचे शिक्षक वसीम उपस्थित होते. नेरूळ येथे सरपंच आशाबाई पाटील, मनीषा गोपाल पाटील, ललिता पाटील, उदयभान पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी गावातील मंडळी विलास पाटील, विकास पाटील, समाधान खैरे, ग्रामसेवक सुरेश अप्पा यांची उपस्थिती लाभली. पाडले बु. हमीद तडवी,ईश्वर महाजन,यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले करण्यात आले. त्याप्रसंगी गावातील मंडळी हर्षल महाजन,अंकुश महाजन,चेतन महाजन उपस्थित होते. पाडले खुर्द पोलीस पाटील किशोर चौधरी, महेंद्र पाटील यांच्या हस्ते वृषारोपन करण्यात आले. त्याप्रसंगी गावातील मंडळी उपस्थित होते.