धनंजय चौधरी यांनी साधला डोंगर कठोरा परिसरातील नागरिकांशी संवाद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आ. शिरीष चौधरी मार्गदर्शनात आपल्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे असे आश्वासक विधान धनंजय चौधरी यांनी केले. सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरकठोरा व सांगवी बु. येथे धनंजय चौधरी यांचा कृतज्ञता संवाद यात्रा सुरू केली. स्व.मधुकरराव चौधरी यांचे विशेष प्रेम व आपुलकी व जिव्हाळा असलेले असे डोंगरकठोरा हे गाव, या गावासाठी मधुकरराव चौधरी यांच्या दूरदृष्टीकोनातून तसेच अथक प्रयत्नातून या गावाच्या आजूबाजू भोवती पाच ते सहा लघुबंधारे तसेच कळाचे धरण निर्माण केलेले आहे.या कळाच्या धरणामुळे या गावातील जमिनीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे. तसेच डोंगरकठोर हे गाव फार जुन्या काळापासून वसलेले असून या गावाच्या पाच किलोमीटर जवळच श्रीपंत मंदिर आनंदवन डोंगरदे हे क्षेत्र एक पर्यटन स्थळ व हिंदू समाजाचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

येथे दरवर्षी हजारोच्या संख्येने भाविक येत असतात.तसेच दांडा पौर्णिमे निमित्त इथे मंदिरात मोठी यात्रा भरते.डोंगरकठोरा या गावातील अच्युत धनाजी विद्यालय तसेच ज्युनिअर कॉलेज हे कै.मधुकरराव चौधरी शिक्षणमंत्री असताना परवानगी मिळून हे महाविद्यालय निर्माण झालेले आहे. वैशिष्ट्यपूर्ण अशा या गावामध्ये चैत्र महिन्यात होळीची मोठी यात्रा भरते. स्वामीनारायण मंदिरा पासून खंडोबा वाडी पर्यंत बारा गाड्या ओढले जातात.या गावांमध्ये होळी व पोळा हे उत्सव सर्वधर्मसमभाव याप्रमाणे सर्व स्त्री पुरुष एकत्र येऊन साजरे करतात अशी माहिती गावाचे सरपंच नवाज तडवी, उपसरपंच योगेश पाटील व डॉ. झांबरे यांनी बोलताना दिली. अशा या गावामध्ये सकाळी धनंजय यांनी कृतज्ञता दौरा केला.

या दौरा प्रसंगी सर्वप्रथम गावातील देवस्थान हनुमान मंदिर स्वामीनारायण मंदिर दत्त मंदिर, खंडेराव देवस्थान मंदिर, विठ्ठल मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले. तसेच गावात पूर्वी काळापासून चालत आलेला वारकरी संप्रदायाचा प्रत्यक्ष अनुभवाला मिळाला.या गावात धनंजय चौधरींच्या स्वागत वारकरी संप्रदायातील लोकांनी टाळ मृदुंग व अभंगांची साथ घेऊन केले. याप्रसंगी असंख्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला. तसेच डोंगर कठोरा ग्रामस्थांच्या हस्ते जलपूजन तसेच डोंगरकठोरा गावाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देऊन मयत झालेल्या व्यक्तींप्रती अच्युत धनाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी गावकऱ्यांनी दिंडी काढून दिंडी सोबतच जलपूजन व वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर गावामध्ये फेरी घेऊन गावकऱ्यांच्या अडी अडचणी धनंजय भाऊनी यांनी जाणून घेतल्या. तसेच गावातील जे विद्यार्थी विद्यार्थिनी सांगवी येथे शिक्षणाच्या उद्देशाने जात असतात त्यांना बस सेवा वेळेत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून पाहून समोर मांडण्यात आली त्याप्रसंगी भाऊंनी तत्काळ बस नियंत्रक यांच्याशी संपर्क करून त्यांची बस व्यवस्था करून दिली. त्यावेळेस कमालीचे समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती दिसून आले.

आमदार शिरीष चौधरी यांनी गाव तेथे रस्ते व गाव तिथे विकास या संकल्पनेतून या गावासाठी सिमेंट रस्ते,पेवर ब्लॉक,जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी, पाईपलाईन अशी स्वरूपाची मोठ्या प्रमाणात आमदार निधी देऊन कामे पूर्ण केलेली आहेत. याप्रसंगी जलपूजन व वृक्षारोपणास डोंगर कठोरा येथे सरपंच नवाज तडवी, उपसरपंच योगेश पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. त्याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक भोजराज पाटील, झांबरे डॉक्टर, अमित भारंबे, प्रीतम राणे, प्रवीण गाजरे, यश वायकुळे, तुषार भीरूळ, अमीन तडवी, यश सरोदे, तेजस सरोदे, सचिन फेगडे, मेहरबान तडवी, सुपडू तडवी, मधु पाटील, पांडुरंग जावळे, दिनकर पाटील, दगडू पाटील, प्रकाश पाटील, नारायण फेगडे, विलास राणे, दालू फेगडे, दगडू पाटील, विनू राणे, रौनक तडवी, साजिद …

Protected Content