जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील विदगाव गावात राहणारे देविदास रेवा ढाके (वय ६८) यांचे १३ सप्टेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून, ते एक शांत, मनमिळावू आणि कुटुंबप्रेमी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.

देविदास ढाके यांचे सामाजिक संबंध तसेच आप्तेष्टांमध्ये सौहार्दाचे नाते होते. त्यांच्या पश्चात तीन मुली, तीन जावई, पुतणे आणि नातवंडे असा परिवार आहे. ते राजेंद्र होले यांचे सासरे होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेक नातेवाईक, मित्र आणि गावकरी अंतिम दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले.

ढाके कुटुंबाने गावात सामाजिक व पारिवारिक नात्यांना कायम महत्त्व दिले असून, देविदास ढाके यांचे आयुष्यही त्या मूल्यांच्या अधारे जगले गेले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांसह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



