मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणूक निकालानंतर १३ दिवसांनी आज नवीन सरकार स्थापन झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. हा शपथविधी सोहळा आझाद मैदानवर पार झाला.
या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते या कार्यक्रमात उपस्थित आहे. यासोबतच एनडीएशासित राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित होते. याशिवाय देशभरातील 400 संत-मुनी सहभागी झाले होते.