देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे.

 

देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. मला करोनाची लागण झाली असून मी गृह विलगीकरणात असल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. फडणवीस काल सोलापूर दौर्‍यावर असतांना त्यांना ताप जाणवू लागला होता. त्यांनी कोविडची चाचणी करून घेतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना कोरोनाची दुसर्‍यांदा लागण झालेली आहे.

 

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. अलीकडेच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता राज्यात देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Protected Content