सरकारचे डोके ठिकाणावर आहे का : फडणवीसांचा संतप्त सवाल

30BMDEVENDRAFADNAVIS

मुंबई प्रतिनिधी । जाळपोळ करणार्‍यांना सरकारकडून परवानगी मिळतेय. परंतु, आम्हाला परवानगी नाकारली जाते. राज्यातील सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर जोरदार टीकास्त्र सोडले.

भाजपने आज ऑगस्ट क्रांती मैदानात नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढली. परंतु, पोलिसांनी भाजपच्या या रॅलीला परवानगी नाकारली. ऑगस्ट मैदानात झालेल्या सभेत फडणवीस यांनी शिवसेना व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आम्ही शांतपणे लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची परवानगी मागितली होती. ती परवानगीही आम्हाला नाकारण्यात आली. लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची संमती हे सरकार नाकारत असेल तर मला टिळकांनी जो प्रश्‍न विचारला तो विचारावाच लागेल की या सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? सुधारित नागरिकत्व कायद्याचं समर्थन करण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. पाकिस्तान, बांगलादेश यामध्ये हिंदूंवर अत्याचार झाले ते या संकुचित लोकांना दिसत नाही का? असाही प्रश्‍न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

Protected Content