मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । शिवसेनेने भाजपसोबत युतीमध्ये निवडणूक लढवली आणि सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बनवले. मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी युतीधर्म मोडला असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोव्यात प्रचार करत असतांना संवाद साधतांना म्हणाले.
महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिले आहे की, “शिवसेनेने निवडणूक लढवतांना भाजपसोबत युती केली. मत मागतांना लोकांना मोदीजींचे फोटो दाखवून मत मागितले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आपले शासन बनविले. तुम्ही केवळ मुख्यमंत्री पदासाठी युतीधर्म मोडला असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केला आहे.
सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. अशातच मागील २५ वर्षापासून शिवसेना गोव्यात निवडणूक लढवत आहे. पण एकदाही ते त्यांच्या उमेदवाराचे डिपॉजीट वाचूव शकले नाहीत असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.