शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही ; राऊत यांचा फडणवीसांना टोला

sanjay raut devendra fadnavis

 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला हिंदुत्व आणि स्वाभिमानाची आठवण करून दिली होती. यावर आम्ही शिवसैनिक आहोत. स्वाभिमान, हिंदुत्व यांवरची सर्व उत्तरं मिळतील. आम्हाला कुणी शहाणपणा शिकवू नये, अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना उत्तर दिले आहे.

 

बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन असून, आदरांजली वाहण्यासाठी राजकीय नेत्यांसह शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावर गर्दी केली आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी फडणवीस यांना उत्तर दिले. राऊत म्हणाले, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना वचन दिले आहे. ते पूर्ण होणार आहे. बाळासाहेबांसाठी काहीही करू. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, असा टोला राऊत यांनी लगावला. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे आणि तो शिवतीर्थावर येईल, असे सांगत संजय राऊत यांनी लवकरच सरकार स्थापन होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Protected Content