Home Cities अमळनेर मुडी गावात विकासकामांचे शुभारंभ! माजी जि.प. सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

मुडी गावात विकासकामांचे शुभारंभ! माजी जि.प. सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मुडी प्र. डांगरी गावात आज विकासकामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद व डीपीडीसीच्या जनसुविधा योजनेंतर्गत मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन माजी जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून ही विकासकामे मंजूर झाली आहेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी मंजूर झालेल्या २० लाख रुपयांच्या निधीतून होणाऱ्या बांधकामाचे भूमिपूजन सौ. जयश्री पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर, १५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या तलाठी कार्यालयाचे लोकार्पण बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांच्या हस्ते झाले. याचबरोबर, ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत मंजूर झालेल्या १० लाख रुपये खर्चाच्या रस्ता काँक्रेटीकरण व चौक सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन लोकनियुक्त सरपंच सौ. मंदाबाई भावराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या विकासकामांच्या शुभारंभामुळे मुडी गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी उदयराजे भावराव पाटील, नानासाहेब पाटील, संजय पाटील, अरविंद हिमतराव पाटील, राजेंद्र वानखेडे, नारायण पाटील, महेंद्र पाटील, हेमंतराव पाटील, पंढरिनाथ पाटील, गौरव पाटील, गणेश भोई, मनोहर पाटील, गणेश बडगुजर, प्रणव पाटील, तुषार पाटील, संजय वडर, उदय पाटील, संजय पाटील, भैय्यासाहेब पवार, किशोर पारधी, ग्रामपंचायत अधिकारी विनोद पाटील यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार अनिल पाटील आणि सौ. जयश्रीताई पाटील यांच्या प्रयत्नातून गावात होत असलेल्या या भौतिक विकासाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


Protected Content

Play sound