रावेर प्रतिनिधी । रावेर शहरासह तालुक्यात विकासकामांचा झंझावात सुरू असून काही कामे झाली तर काहींना प्रारंभ होणार असल्याची माहिती आज आमदार हरीभाऊ जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार हरीभाऊ जावळे म्हणाले की, तालुक्यात रस्ते इमारती सबस्टेशन यासह विविध विकास कामांचा झंजावात सुरु झाला आहे या कामांसाठी सुमारे २५८ कोटी रुपये मंजूर झाले असुन काही कामे झाले आहे तर काही कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे त्यापैकी पाल-पिंपरूळ या रस्त्यासाठी ९९ कोटी रुपये मंजूर झाले आहे. या कामांचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आ हरिभाऊ जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली
लवकरच होणार हद्दवाढ
आमदार जावळे पुढे म्हणाले की, यामध्ये रावेर शहराची हद्दवाढ लवकरच मार्गे लागणार,तर शहरात मंगलकार्यालयासाठी २ कोटी २४ लाख मंजूर झाले आहे तर भिकनगांव-पाल-पिंपरुळ ९९ कोटी,अमोदा-पाल ४५ लाख,पाल कुसुंबा ३० लाख, अंकलेश्वर बरहानपुर दिड कोटी, चिनावल-वडगाव ३० लाख जिन्सी-मोरव्हाल ८० लाख,खिरोदा-चिनावल-बलवाडी अडीच कोटी,एनपुर अजंदे १ कोटी ६० लाख,खिरोदा-फैजपुर ५ कोटी ३३ लाख,पाल-मोरव्हाल रसलपुर १ कोटी २३ लाख,भोर-पुनखेड़ा-पातोंडी २कोटी २० लाख,उटखेडा-चिनावल ५८ लाख,भोकरी-जूनोने १ कोटी ८७ लाख यासह मतदारसंघात २५८ कोटीची कामे आचारसहिता लागण्यापूर्वी सुरु होणार आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी त्यांच्यासोबत माजी शिक्षण सभापती सुरेश धनके भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील भाजपा सरचिटणीस विलास चौधरी, शहराध्यक्ष मनोज श्रावग पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी पी. के. महाजन, माजी शहराध्यक्ष उमेश महाजन हरलाल कोळी संदीप सावळे आदी भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.