रावेर प्रतिनिधी । तांदलवाडी गावाचा सर्वांगीण विकास हेच माझे लक्ष आहे. गावात मूलभूत सुविधा पुरण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. मी अपक्ष निवडून आली असून माझा अद्यापही कोणत्याही पक्षाशी संबध नसल्याचे भावी सरपंच सुरेखा तायडे यांनी स्पष्ट केले आहे.
तालुक्यातील तांदलवाडी गावाचे सरपंचपद अनुसूचित जाती जमाती साठी निश्चित झाल्याने या प्रवर्गातुन तांदलवाडी येथे सुरेखा सिदार्थ तायडे या निवडुन आल्या आहे. त्या आता गावाचा कारभार बघणार आहे.त्यांची उमेदवारी अपक्ष होती अद्यापी मी कोणत्याच पक्षात प्रवेश केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून गावाच्या विकासासाठी मदत करणाराच माझा पक्ष असून गावाचा सर्वांगीण विकास हेच माझ लक्ष असल्याचे त्या म्हणाल्या गावात मूलभूत सुविधा पुरण्यासाठी प्रर्यत्न करणार असल्याचे भावी सरपंच सुरेखा तायडे यांनी सांगितले.
पत्नी अपक्ष तर पती राष्ट्रवादी सोबत
येथील तांदलवाडीचे भावी सरपंच सुरेखा तायडे यांचे पती सिदार्थ तायडे आज काही कार्यकर्ता सोबत माजी मंत्री श्री खडसे यांची भेट घेतली यावेळी जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांच्या उपस्थिती राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे फोटो व्हायरल झाल्या नंतर तांदलवाडी गावाचे राजकारण चांगलच ढवळुन निघाले अखेर संध्याकाळी सरपंच पती सिदार्थ तायडे यांनी आपली भूमिका जाहिर करत सांगितले की मी जरी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षा सोबत असलो तरी माझ्या पत्नी सुरेखा तायडे यांचा कोणत्याच पक्षाशी संबध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.